ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनीतरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र.
The Stotra Pathan courses aim at proper teaching as to how the stotra is to be pronounced. Not only the pronunciation but it also provides information as to when it is to be said and the purpose for which is to be said.
आपलं संस्कृत वाङ्मय अतिशय समृद्ध आहे. सर्व भाषांचा उगम संस्कृत भाषेतून झाला असा या भाषेचा लौकिकही आहे. या संस्कृत भाषेला ‘गीर्वाणभारती’ म्हणजे देवांची भाषा असंही मानलं जातं. संस्कृत साहित्यात स्तोत्र वाङ्मयाचं एक विशेष स्थान आहे. या साऱ्या वाङ्मयात प्रामुख्याने देवदेवतांची स्तुती केलेली आढळते. उदा. ‘रामरक्षा स्तोत्र’, ‘व्यंकटेश स्तोत्र’, ‘श्री गणपती अथर्वशीर्ष’, ‘श्री सूक्त’ ‘पुरुष सूक्त’ आदी स्तोत्रांची नावं घेता येतील. आजही ही स्तोत्रं अनेकांच्या पठणत असलेली आपण पाहतो. देवदेवतांवर श्रद्धा बाळगणाऱ्या श्रद्धावंतांना अशा स्तोत्रांचा लौकिक व पारमार्थिक अर्थाने लाभ होतो. त्याचबरोबर उच्चारही सुस्पष्ट होतात.
स्तोत्र पठणाच्या वर्गामध्ये शास्त्र शुद्ध उच्चारण कसे व्हावे हे शिकविले जाते प्रत्येक प्रशिक्षणार्थीचे उच्चारण योग्य होते आहे की नाही याकडे विशेष लक्ष देऊन आवश्यक तिथे सुधारणा सांगितल्या जातात.
अभ्यासक्रम
- 2 Sections
- 0 Lessons
- 10 Weeks
- Strot Uchharan Margdarshana (स्तोत्र उच्चारण मार्गदर्शन)0
- Strot Pathan (स्तोत्र पठण) - audio0