पौरोहित्य प्रशिक्षण वर्ग

Event Date

ऑक्टोबर 22, 2022

Event Description

घरोघरी पौरोहित्य – व्यवसाय नव्हे तर काळाची गरज
उत्तर अमेरिकेतील मराठी बंधू – भगिनींसाठी
पौरोहित्याचे online प्रशिक्षण वर्ग
द्विस्तरीय प्रशिक्षण
मूलभूत स्तर – आरंभ १ ऑक्टोबर २०२२ पासून
वेळ – दर शनिवारी सकाळी दीड तासाचे सत्र
कालावधी ४ महिने
|| शास्त्रशुद्ध मंत्रोच्चारण || स्तोत्र पठण || षोडशोपचार पूजाविधी ||
|| नित्योपयोगी पूजा || गणपती प्रतिष्ठापना || सत्यनारायण पूजा ||
अनुभवी आणि ज्ञानी गुरुजींकडून मार्गदर्शन
ऑडिओ आणि विडिओ पण उपलब्ध

हिंदू धर्मात अगदी वेदांच्या काळापासून पौरोहित्याची परंपरा प्रचलित आहे.
काळाच्या ओघात अनेक गोष्टींमध्ये बदल झाले तरी विविध धार्मिक संस्कार, देवताचे पूजन, कुळाचार आणि धार्मिक उत्सव अशा बाबतीत मात्र माणसाचे मन भावुक असते आणि हे संस्कार परंपरेनुसार शास्त्रोक्त पद्धतीने व्हावेत अशी मनोमन इच्छा असते आणि अशा वेळी पुरोहितांची निकड भासते.

पूजेची तयारी काय करायला पाहिजे, पूजा कशी मांडली पाहिजे,
पूजा विधीचे प्रात्यक्षिक या विषयीचे सर्व ज्ञान अभ्यासक्रमातून दिले जाईल .

मूलभूत स्तर – अभ्यासक्रमाची माहिती

हा स्तर पूर्ण झाल्यानंतर तुम्ही काय करु शकाल?

  • शास्त्रशुद्ध मंत्रोच्चारण / मंत्रोच्चाराची सवय होण्यासाठी नेहेमी वाचनात येणाऱ्या महत्त्वाच्या स्तोत्रांची माहिती व पठण

(श्रीगणपतिअथर्वशीर्ष, पुरुषसूक्त व श्री सूक्त)

  • षोडशोपचार पूजाविधी
  • घरामध्ये षोडशोपचार पूजाविधी आणि विविध देवतांच्या अभिषेकासह पूजा करता येणे
  • मूलभूत स्तर पूर्ण झाल्यावर गणपती प्रतिष्ठापना व विसर्जन, सत्यनारायण पूजा, गृहप्रवेश पूजा, घट स्थापना, मंगळागौर या सारख्या विशिष्ट पूजा वर्ग घेणाऱ्या गुरुजींकडून विशेष मार्गदर्शन घेऊन करणे शक्य होईल.
  • याखेरीज जिज्ञासूंना काही विशिष्ट स्तोत्र पठण (उदा. शिवमहिम्न स्तोत्र, सप्तशती, रुद्र इत्यादि) किंवा काही विशिष्ट पूजा विधी शिकायचे असतील तर त्यासंबंधी पण विशिष्ट वर्ग घेणे शक्य आहे. मात्र अभ्यासूंची किमान संख्या अपेक्षित राहील.

आमची वैशिष्ट्ये

  • प्रशिक्षण वर्गात जेंव्हा एखादा नवीन विषय, स्तोत्र घेतले जाईल त्याच्या एक आठवडा आधी या विषयीची लेखी माहिती व श्लोकांचे ऑडिओ पाठविले जातील.
  • वर्गामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडून अनुपठण करुन घेतले जाईल आणि काही सुधारणा असतील तर त्याविषयी मार्गदर्शन केले जाईल.
  • मुख्य म्हणजे पूजा विधी करताना त्या विधीची माहिती, त्याचे महत्त्व समजावून सांगितले जाईल त्यामुळे पूजा यांत्रिकपणे न करता अर्थ जाणून केली जाईल.
  • याचबरोबर विविध उपयुक्त संदर्भ ग्रंथांची माहिती दिली जाईल.
  • पूजा विधीची एक PDF (Downloadedable) पाठविली जाईल जी वाचून सुद्धा पूजा सांगता येईल
  • वर्गामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित राहील त्याद्वारे प्रत्येकाकडे पूर्ण लक्ष देता येईल.
  • अनुभवी , ज्ञानी आणि शिकवण्याची आवड असलेला पुरोहित वर्ग

अभ्यासक्रमाचे नियम

  • वयोमर्यादा 15 वर्षे पूर्ण आणि त्याच्या पुढे.
  • देवनागरी – मराठी किंवा हिंदी अक्षरओळख अपेक्षित आहे. 
  • महिला – पुरुष सर्वांना मुक्त प्रवेश
  • प्रशिक्षण वर्गाचे शुल्क USD  राहील

ज्यांना या वर्गात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी खाली दिलेल्या लिंक वरुन फॉर्म भरुन आवश्यक ती माहिती द्यावी.

त्यानंतरचा संपर्क प्रथम इमेल ने केला जाईल व नंतर सर्वांच्या सोयीसाठी WA ग्रुपच्या माध्यमातून सूचना दिल्या जातील.

Expired
This event has ended
Ended on ऑक्टोबर 31, 2022 12:00 am
Tickets sold 0
Organized By: 
Total Seats
20
Available Seats
20
मराठी