संस्थेतर्फे शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त असे उपक्रम सातत्याने राबविले जातात.
संस्कृतच्या उपयोगाने मुलांचे उच्चारण शुध्द होते. एकाग्रता वाढते आणि वाणी शुध्द होते. हे सर्व उपक्रम राबवितांना मुलांच्या शाळेच्या विचार करुन नियोजन केले जाते.
संस्कार वर्ग: पाठशाळेतर्फे वय वर्षे ५ ते १० या गटातील मुलांकरिता संस्कृत संस्कार वर्गाचे आयोजन केले जाते. यात विद्यार्थ्यांना संस्कृत गाणी. गोष्टी, लहान लहान स्तोत्रे, अंक, घड्याळ, वार इ. संस्कृत मधून शिकविले जाते. Speech Therapy घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्कार वर्गातील संस्कृत पठणाचा फायदा झाल्याचे काही पालकांनी सांगितले.