प्रौढांकरिता पौराहित्य प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते.
पौराहित्य प्रशिक्षण वर्गात षोडचोपचार पूजा, श्रीगणपती अथर्वशीर्ष, श्री सूक्त, पुरुष सूक्त, विष्णु सहस्रनाम अशी विविध स्तोत्रे, जी विविध पूजा विधींसाठी आवश्यक असतात, ती शिकविली जातात.
षोडशोपचार पूजा विधी बरोबर श्री गणपती प्रतिष्ठापना पूजा , श्री सत्यनारायण पूजा गृह प्रवेश अशा विविध नित्योपयोगी पूजा शिकविल्या जातात.